STORYMIRROR

rupali hambarde

Inspirational

3  

rupali hambarde

Inspirational

माझी कविता

माझी कविता

1 min
158

एक निरागस कविता 

मनात अलवार रुजली

वेदना, दाह सोसूनही 

अंतरात हळूवार अंकुरली ....


शिशिराची सोसून पानगळ

वसंतापरी बहरली

होउन सखी माझी

हृदयात निरंतर वसली.......


कधीं शब्दातून व्यक्त जाहली

कधीं मौनातून बोलली

कविता माझ्यात सदा

प्राजक्तगंधापरी दरवळली.....     



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational