मराठी भाषा दिनमाय मराठी
मराठी भाषा दिनमाय मराठी
माझी माय मराठी माऊली
मायेची ग साऊली,
भाग्य आमुचे असे थोर
आम्हा छाया हिची लाभली।।
कधी असते मृदू
सायी वानी अलवार,
कधी उग्र रूप बाई
जणू शिवबाची तलवार।।
कधी बहिणाबाई ची
अहिराणी असे बोली,
कधी ज्ञानियांची गंगा
ज्ञानेश्वरी ही जाहली।।
हीचा नीत नवा रंग
रोज आगळा सोहळा,
चोखा ,नामा आणि तुका
वाळवंटी होतसे मेळा।।
माय मराठी जणू
निरंजनाची ज्योती,
शब्द ओघळती त्याचे
होती मोलाचे मोती।।
माय माझी आहे
माझ्या तनात मनात,
स्पंदनात वसली
अन वाहते कणाकणात।
