तुझी प्रीत...
तुझी प्रीत...
कोवळ्या मनातून वाहतो तुझ्या प्रीतीचा झरा
होतो बेधुंद वारा घेऊन आसमंत सारा
कृष्ण येईल तुझा लवकर नको वाट पाहूस इतकी
विश्वास ठेव तुझ्या प्रेमावर प्रीत जुळून येईल नक्की
तुलना करणं तुझ्याशी कुणालाच शोभत नाही
तुझ्यासारखा रंग असा त्या इंद्रधनुतही नाही