तुझे ते माझे
तुझे ते माझे
तुला आपल मानता
तुझे न् माझे संपले
होता समरस तुझ्यात
माझे मी पण नुरले
उरले न परके पणा
होता एक, दोन जीव
सर्व आहे आपलच
ठेव याची जाणीव
तुझ माझे काही नाही
केले समर्पण एकमेकात
एकरूप होऊन जगू
मिळेल आनंद मनात
दोघे असता एकत्र
येवो किती उन पाऊस
हात हाती सदा असता
उपभोगु जीवनाची हौस
तुझ ते माझे विचार
आता बिंबवले मनी
नको चिंता उरी आता
राहू आनंदी मनोमनी