STORYMIRROR

Smita Vivek Agte

Romance

4  

Smita Vivek Agte

Romance

ओल्या सांजवेळी

ओल्या सांजवेळी

1 min
423

ओल्या त्या सांजवेळी बरसती धारा अंगावरी

शिरशिरी ही कणाकणात, नाद उठे बघ अंतरी

साजणा रे प्रीत माझी जडली आज तुझ्यावरी


का मिटती हे डोळे, लाज वाटुन फडफडे पापणी

धडधड उरी का व्हावी, निशब्द ही तुझी साजणी

मिटुनी अधर, नजर झुकावी, मनी हुरहूर क्षणोक्षणी


वाटे मज अशीच रहावी, न संपावी ही सांज प्रीतीची

असेच राहावे बघत तुला, तरी येई ही वेळ परतीची 

वळती पाय माघारी परी हृदयात ओढ ही मिलनाची


हातात रहावे हात आपुले, अन् श्वासात भिनावे श्वास 

देऊ वचन ही प्रीत राहो निरंतर, नकोत नुसते भास

ओल्या त्या सांजवेळी, हे प्रेम होऊ दे उद्याची आरास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance