STORYMIRROR

Shrinivas Varunjikar

Romance

4  

Shrinivas Varunjikar

Romance

असा प्रत्येकीचा कृष्ण ...

असा प्रत्येकीचा कृष्ण ...

1 min
348

इवल्याशा पावलांना

दूर क्षितिजाची आस...

नजरेत स्वप्नमाला

आणि अंतहीन प्रवास...1.


निळ्या पहाडात माझे

कसे रमेल रे मन...

चल दूर जाऊ तिथे

पाहू चांदण्यांचे बन...2.


साद घालितो रे कोण

त्यास देऊ शब्दनाद...

गाऊ सानुल्या ओठाने

कोण्या पाखराचे गान...3.


कुणी केसात खोवले

फूल पिवळे पिवळे...

आणि मनातही कुणाचे

रुप सावळे सावळे...4.


असा प्रत्येकीचा कृष्ण

दूर रहातो अंतरी ...

आणि जाणते रे राधा

त्याची माया अंतरी...5.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance