Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या

मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या

2 mins
14.2K




मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


मी जागत राहायची

रात्र-रात्रभर.....

अंथरूणात तळमळत,

या कुशीवरून त्या कुशीवर

कूस पालटत.....

तुझ्या आठवणीत.....


पण तुला,

आठवण नसायची माझी.....

तू विचारही करायचा नाहीस

माझ्याबद्दल.....

पण, मी मात्र

माझ्या प्रत्येक रात्रीवर

तुझंच नाव कोरलेलं.....

मला रात्रभर आठवायचास तू.....


तू आणि फक्त तू.....

अशा कितीतरी रात्री

मी जागतच काढल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


मी वाट बघायची तुझी

हरघडी, प्रत्येक प्रहर....

तासन् - तास.....

त्या बागेमध्ये

हिरव्या-हिरव्या हिरवळीत

ताटकळत उभी राहायची मी

कितीतरी वेळ

पण,


तू यायचाच नाहीस

तरीही मी तशीच

गुपचूप बसून राहायची

इकडे-तिकडे पाहात.....

त्या रिकाम्या झुल्यांकडे बघतांना

मला आठवतं राहायचे.....

आपले सोबतीचे क्षण.....

शेवटी तुझ्या आठवणी

अश्रूंच्या रूपाने नेत्रांतून वाहायच्या.....


माझ्या नेत्रांतून वाहणाऱ्या

त्या तुझ्या आठवणी

मी सदैवच पाहिल्या....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


आपण पाहिलेली

सुखी संसाराची स्वप्नं.....

आपलं छानसं घरटं,

चिवचिवती पाखरं.....

आणि त्या पाखरांचा किलबिलाट.....

जी स्वप्नं कधीच पूर्ण झाली नाहीत

आणि जी कधी पूर्ण

होणारच नव्हती.....

तू माझ्या सोबत नसतांना

ते आपले सुंदर स्वप्न

त्या सर्व सुंदर आठवणी

मी कुंचल्याने रेखाटल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


वार, खुणा, जखमा

या फक्त शरीरावरच होत नसतात ना.....

कधी-कधी शब्दसुद्धा मनावर

असंख्य वार करून जातात....

हृदयाची चिरफाड करतात....

नाजूक मनाची लक्तरं

उडवत जातात....

प्राण छिन्न-विछिन्न करून जातात....

तू ही तसंच केलंस....

माझे काळीज चिरडून निघून गेलास.....

एकटीच उरली मी,

तुझ्या विरहात दुःख सहन करत.....

तेव्हा आपल्या प्रेममयी भावना

रक्ताने माखल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


जखमा माझ्या हृदयावरच्या,

मनाची केलेली चिरफाड,

अपेक्षाभंगाचे व्रण,

आशेला लावलेले गालबोट,

विश्वासघात,

विरहाच्या खुणा.....

तुझी आठवण आल्यावर

चिघळत राहायच्या सर्व जखमा.....

चिघळून-चिघळून तरी किती चिघळतील ?

त्या सर्व जखमा

बऱ्या होण्याआधीच सुकल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


एखादा व्यक्ती जेेेव्हा

आपल्या आयुष्यातून निघून जातो.....

त्याच्या सर्व खुणा पुसून टाकतो

आपल्या जीवनात फक्त

त्या खुणांचे चट्टे उमटलेले राहतात.....

अशावेळी,

आपणही ते व्रण मिटवायचाच

प्रयत्न करतो.....

तसे प्रयत्न मी सुद्धा करून बघितले

पण,

तोकडे पडले ते सर्व प्रयत्न

त्या प्रयत्नांना यश आले नाही.....

हे वेगळे सांगायला नको.....

तनाने, मनाने अशा कितीतरी

यातना मी साहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


जर झाले असते आपले लग्न,

तर.....

आपल्या संसारवेलीवर

नाजूक फुले फुलली असती.....

आपल्या घरट्यात पाखरांच्या

चिवचिवाटाचा, किलबिलाटाचा

आवाज घुमला असता.....

आपण चिमणा-चिमणीने सुखाचा

संसार केला असता.....

आपली संसारवेल

बहरून गेली असती,

पण तसे झाले नाही.....

त्या नाजूक कळया मनातल्या,

फुलण्याआधीच खुडल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


तुझ्या प्रेतावर

आज मी फुले वाहत होती

तू डोळे बंद करून पडून होतास.....

नेहमीप्रमाणे,

तू माझ्याकडे बघितलं सुद्धा नाहीस

तुला शुद्धच कुठे होती....

कारण,

तुला कधी शुद्ध येणारच नव्हती.....

तू चिरनिद्रेत कायमचा

निद्रिस्त होतास म्हणून.....

तेव्हा तुझ्याबद्दलच्या

माझ्या सर्व तरल भावना

अश्रुंतून झरझर वाहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


तू नसतांना एकाकी जीवनात

मी का खितपत पडावं ?

मी तरी का जगावं ?

जगली तरीही

मी कोणासाठी जगू ?

ज्या व्यक्तीसाठी मी जगत होते,

तो व्यक्तीच नसेल.....

तर,

काय अर्थ आहे या जिंदगीला.....

त्यापेक्षा,

हे आयुष्य तरी संपवून टाकावे.....

मला असे आयुष्यच नको

ज्यात तू नाहीस.....

तुझ्याशिवाय जगण्याची

कल्पनासुद्धा मला सहन होत नाही.....

अशा रंगहीन आयुष्यसाठी

मला नाही जगायचं.....

तू होतास तेव्हा,

रंग होते, गीत होते.....

धुंद संगीत होते.....

पण आता,

तू नसल्यावर बेरंगी आयुष्य.....

जगण्याची इच्छाच मरून गेली.....


म्हणून,

तुझ्या आठवणीत मी ही

कायमच्या

माझ्या पापण्या मिटल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....

आणि मनातल्या गोष्टी

मनातच राहिल्या.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance