सुंदरा
सुंदरा
बोलके नयन कटाक्ष तुझे
भुवया भासे जणू कट्यार..!
गोड गुलाबी गोबरे गाल
नाक कसे धारदार..!!
लाल गोजिऱ्या रंगाची साडी
त्यावर नाजूक कोरीव किनार..!
घायाळ करतो मला प्रिये
तुझा मनभावन साज शृंगार..!!
हरिणीसम मादक चाल
सावरते साडीचा पदर..!
चंद्रासम सुंदर मुखडा
तू माझ्या नशीबाची लकेर..!!
तुझे हरिणीसारखे डोळे
फुलपाखरासारखी चाल..!
ओठ मधाचा थेंब
मी होतोय पुरता बेहाल..!!
सौंदर्य तुझ आगळं वेगळं
जादू मजवर फारच भारी..!
सुंदरा तू माझ्या मनाची
रेशमी कुंतलांची अदा न्यारी..!!
मोकळ्या मुठीने प्रेम दे
मी किती आहे ओशाळ..!
सखे, तुझ्याविना अर्धवट
माझ्या जीवनाचे आभाळ...!!