Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priya Bhambure

Romance

3.0  

Priya Bhambure

Romance

पाऊस कविता स्पर्धा

पाऊस कविता स्पर्धा

1 min
335


आत्ता मी पावसाला विचारलं

तुझं *वय* काय?

पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,

जर तू पावसात सैर वैरा

*आनंदात धावत* असशील

तर माझं *वय १० !*

जर तू पावसात

*कविता* लिहित असशील

तर माझं *वय १६ !*

जर तुला पावसात

*विरह* जाणवत असेल

तर माझं *वय १८ ते २०!*

जर तुला पावसात

*ट्रेकिंग* ला जावंस वाटत

असेल तर माझं *वय २४ !*

जर तुला पावसात

*गजरा* घ्यावासा वाटत असेल

तर माझं *वय ३० !*

जर तुला *मित्रां*सोबत

पावसात भिजत *भजी*

खावी

असं वाटत असेल

तर माझं *वय ४० ते ४५ !*

मग मी पावसाला म्हणालो

*"अरे एक काय ते वय सांग,*

*असा शब्दात गुंतवू नकोस!"*

पाऊस स्मितहास्य देऊन म्हणाला,

*मला तू जसा अनुभवशील*

*तेच माझे वय!*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance