STORYMIRROR

Priya Bhambure

Romance Others

2  

Priya Bhambure

Romance Others

पागोळ्या

पागोळ्या

1 min
24

चित्रविचित्र धुरकट ढगांच्या काजळलेल्या काळ्या कडा जणु चालतो ठुमकत ललना घेऊनी पाण्याचा घडा 


अक्राळविक्राळ ढगांचा अचानक आकाशात गडगडाट क्रुर नटखट विजेचा क्षणाक्षणात कडकडाट 


टप टप टप पाऊस फुलांचा अंगणी माझ्या वर्षाव झाला पाऊस सखा कुशीतधरणीच्या समाधानाने विसावला 


थंडगार वा-याच्या लाटेनेअंगअंगात रोमांच थरारले तुझ्या-माझ्या प्रेमाचे क्षण नकळत मनाला सुखावून गेले 


एकाच छत्रीतुन कधी फ़िरतांना पावसातुन चिंब भिजणे अस्पष्ट स्पर्शाच्या त्या जाणिवेने आजही मनाने शहारून जाणे 


थोडे भांडण, थोडा रुसवा तरीही ओढ पुन्हा प्रितीचीनाही समजले खुळ्या मनालाही रे कसली रीत प्रीतीची 


तुझ्यासवे असतांना वेळेचे ही भान उरत नाही सोडून परत तुला मीलनाच्या घडीची मी वाट पाहत राही 


असे कसे आहे हे आपले बंधनसोडून गेलास तु मला तरीसुद्धा अजुनही अटकते माझे मन हे कळत नाही का तुला?

म्हणूनी सांगावसे वाटते 

आजही तुला,माझ्यासवे नसलास तरीही नेहमीच येतो हा पावसाळा दारावरती थाप देऊनीअश्रुंनी भिजवतो मजला 


जीवनाच्या गर्द काळोख्यात आजही .....,पागोळ्या गळतात आणितुझ्या - माझ्या प्रेमाच्या आठवणी दाटतात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance