कविता दिन निमित्त
कविता दिन निमित्त
कवितेच्या रंगात रंगून जाऊया
तिच्या विश्वात हरवून जाऊया
तीच्याशी हितगुज करूनी
आपल्या मनाला विसावू या
सुंदर आपल्याला मैत्रीण
हिच्यासारखी नाही कोणी
नाही कोणते नियमांचे पाश नसे
आणत नात्यात पण न्आणी
मायेची उबदार पांघरुण असते
ही वहीचे शेवटचे पान राहते
आमच्या कवयित्रीची जान असते
मनातलं कागदांवर उमटावीशी वाटते
मनातील उठते ह्यांत प्रतिबिंब
होतो प्रेमाने त्यांत ओलेचिंब
नकळत ह्या डोळ्यांतील थेंबाने
उजळतो प्रतिमेचा जणू हा सूर्यबिंब
सहवासात हिच्या जाणवतो सोहळा
कळतं नाही दिवसाच्या वेळा
वय आमचं राहते नेहमी सोळा
काय हा बंध आगळा वेगळा
म्हणूनच आपण,
कवितेच्या रंगात रंगून जाऊया
तिच्या विश्वात हरवून जाऊया
तीच्याशी हितगुज करूनी
आपल्या मनाला विसावू या......
