STORYMIRROR

Priya Bhambure

Inspirational

4  

Priya Bhambure

Inspirational

आई कुठे काय करते?

आई कुठे काय करते?

1 min
324

सोप्पं असतं म्हणणं 

तु दिवसभर करते तरी काय?

नुसती असते निवांत पसरून पाय


सोप्पं असतं म्हणणं 

तुला कसला आलाय थकवा

काम ओझ माहित आहे का बुवा?


खरंच किती सोप्पं असतं ना

गृहीणी बनून घर सांभाळणं 

दुस-याचं मन जपण्याच्या नादात

स्वतःच्या इच्छांना मुरड घालणं 


पण,ती आई असते,

आई म्हणजे आई असते

तिला सर्वां गोष्टींची घाई असते

आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते

न केलेले प्रश्न सोडवण्यातही सक्षम असते 

वळण लावण्यासाठी दोन-चार धपाटेही देते


आपण खूश असलो तर

कारण न जाणून घेता स्वत: ही हसते

यश मिळाल्यावर अश्रु भरलेल्या डोळ्याने भरभरुन बघते


जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते

मर्जी विरुद्ध किती तरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते


पुढल्या वेळी असे करु नको म्हणत पांघरुण घालते

आपली आवड-नाआवड तिला तोंडी पाठ असते


किती जरी मोठे झालो तरी

आपल्यातच गुंतलेली असते

नि:स्वार्थ प्रेम आणि नातं काय

हे तिच्याकडून शिकायला मिळते

खरंच आई ही देवाहून मुळीच कमी नसते

आई म्हणजे खरंच आई असते

एवढे सगळे ती एकटीच करते

आणि आपण विचारतो ती कुठे काय करते?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational