शब्द माझ्या सोबतीला
शब्द माझ्या सोबतीला
1 min
266
जेव्हा मन असतं फार फार दुःखी
आणि तेव्हाच शब्द माझ्या सोबतीला येती
करायची असल्यास मग जुळवाजुळव ह्या भावनांची
शब्द देती आधार करी वाक्ये तयार प्रीतीची
शब्द सोडवतात ही मनातील जमलेली कोडी
करून देतात सगळं पार ह्या जीवनाची होडी
शब्दा सारखा मित्र कुठे मिळणार नाही
त्यांच्यासारखी साथ पण कुणी देणार नाही
शब्दांचे असतात आपल्या जीवनात महत्व फार
त्यांच्याविना नाही हो ह्या जीवनाला आधार
म्हणुन म्हणते,
शब्दांनो असेच रहा सोबतीला कायम
माझ्यासाठी तुम्हीच नसाल तर जगु कोणासाठी?
