सण दिवाळीचा
सण दिवाळीचा
सण दिवाळीचा, आनंदाचा, मांगल्याचा,
रांगोळीचा,उटण्याचा,दारात पणत्याचा,
आकाश कंदीलने दाही दिशा
प्रकाशाने उजळून टाकण्याचा
पाच दिवस असतात मानाचे
सुरूवात होते वसूबारस दिनी
धनत्रयोदिशी, नरकचतुर्दशी
होई धन, लक्ष्मीची पूजा करूनी
पाडवा भाऊबीज वाढवतो
दोन्ही नात्यांचा पडलाय गोडवा
म्हणतो, वर्षभराचा आनंद
फक्त मनामनांमध्ये साठवा
फराळाची असे रेलचेल रोजची
सोबत अभ्यंग स्नानाची मजा दररोजची
सजली सगळीकडे रांग फक्त
विविध किल्ले आणि पणत्यांच्या दिव्यांची
मांगल्याने सजून येई दिवाळी
अंधाराचा भय पुसून
प्रकाशाचे बीज रूजावे दिवाळी
घरोघरी मन टाकेल उजळून
तुळशीच्या लग्नाच्या मुहूर्तावर
होते दिवाळीची सांगता
ये परत असेच घेऊन आनंद
हीच प्रार्थना सर्वांच्या मुखी आता
