दिवाळी
दिवाळी


या दिवाळीत घरासोबत
आपले मनही उजळू या..!
घराची साफसफाई करतांना
मनाचीही स्वच्छ्ता करू या..!!
दारातील रांगोळीसम इतरांच्या
आयुष्यातही रंग भरू या..!
सुगंधी उटण्याप्रमाणे सुविचारांचा
सुगंध सर्वत्र पसरू या..!!
फराळाची चव चाखतांना
शब्दामध्येही गोडवा आणू या..!
फटाक्यांची आतिषबाजी पेक्षा
प्रेमाची दिवाळी साजरी करू या..!!
आनंदाचे फुले अंथरूण
जीवनातील जळमटे काढू या..!
अंधाराच्या राशी दिव्यांच्या
प्रकाशाने तेजोमय करू या..!!
अंतरीचे दिवे उजळून सकलजण
मानवतेचे सत्व जाणू या..!
सुख समृध्दी ऐश्वर्य निरामयतेने
लक्ष्मी कुबेराचे पूजन करू या..!!