तू माझ्या मिठीत असतांना..
तू माझ्या मिठीत असतांना..


मखमली तुझ्या केसांत
माझी बोटे फिरतांना..!
ओठांनी न्यारी किमया केली
तू मिठीत माझ्या असतांना..!!
ओठांना किती बजावले होते
कसे वागायचे तुला भेटतांना..!
शहाणपणाचे धडेही दिले होते
माझ्या मनालाही समजावतांना..!!
पण सारे धडेच विसरून गेले
तू मिठीत माझ्या असतांना..!!!
तुझ्या गंधभरल्या श्वासांचा
सुगंधी प्रेमस्पर्श अनुभवतांना..!
तुझ्या धडधडणाऱ्या स्पंदनांचे
ते मंजुळ प्रेमगीत ऐकतांना..!!
तुझ्या माथ्यावर चुंबले मी
तू मिठीत माझ्या असतांना..!!!
तुझ्या देहाचे रुपेरी चांदणे
माझ्या अंगावर गोंदवतांना..!
तू गंध रातराणीचा होऊन
माझ्या श्वासात सामावतांना..!!
तुझ्या ओठांनी स्वर्ग गाठला
तू मिठीत माझ्या असतांना..!!!