तुझी मिठी..
तुझी मिठी..


का वाटत मनास माझ्या
एकदा भेटाव तुला पुन्हा..!
मिठीत तुला घेऊन करावा
पुन्हा प्रेमातला तो गोड गुन्हा..!!
स्पंदने वाढतात माझी
तू मिठीत घेतल्यावर..!
मीही देहभान विसरतो
तुझा गुलाबी स्पर्श झाल्यावर..!!
तुझ्या कवेत शिरतांना
श्वासांचा थरथरता गोंधळ उडतो..!
स्पर्श अलवार तुझ्या मिठीचा
स्वर्गी मज घेऊन जातो..!!
धुंद तुझ्या प्रेमाची नशा
घायाळ करते ग मला..!
घेऊन कवेत तृप्त कर
तुझ्यात गुंतलेल्या या देहाला..!!
तुझी मिठी प्रेमभावनांचे
मधुर असे स्पंदन आहे..!
आतुर तुझ्या भेटीसाठी
आश्र्वस्त तुझा चंदन आहे..!!