वेड तुझे...
वेड तुझे...
तुझ्याशी जरा का बोलणे झाले नाही
मला हरवल्यागत वाटायला लागते..!
काही क्षणासाठीच दूर होतीस तू पण
तुझ्याविन सारे नकोसे वाटायला लागले..!!
ही सवय जडली मला की, म्हणू वेड हे
तुझ्या बोलण्यात मी रमायला लागतो..!
अताशा कळले का बेचैन होतो असा मी
जागेपणी स्वप्नात तुला पहायला लागतो..!!
फारसे बोलणे झाले नाही आपले
तर मनाला म्हणून मी समजावयाला लागतो..!
बेभान होऊनी तरीही धावे मन तुझ्याकडेच मग मी कितीही त्याला आवरायला लागतो..!!
पूर्ण रात्र जागतो तुझ्या आठवणीत
तुझे सारे बोलणे आठवायला लागतो..!
गंध रातराणीचा दरवळला तेव्हा मी
तुझ्या मोकळ्या केसांना शोधायला लागतो..!!
गुलाबी थंडीतला वारा बिलगला मनाला
ऊबदार तुझा स्पर्श आठवायला लागतो..!
आता आणखी किती छळशील मला तू
तुझ्याविन कसा मी तडपायला लागतो..!!