मितवा
मितवा


माझ्या डोळ्यांच्या आरशात
साज शृंगार करणारी तू..!
तुझ्या प्रेमदुनियेत मला
आसरा आहे की नाही..!
विचारूनी सांग मला
तुझ्या निरागस डोळ्यांना..!
माझ्या रात्रीच्या नशिबात
तुझा एक प्रहर आहे की नाही ?
टिपून तुझ्या डोळ्यातील चांदणे
अल्लड वाऱ्यासोबत झुलायचं..!
तुझ्या प्रितीच्या उबेत मला
चिंब चिंब भिजायचं..!!
तुझ्या स्पर्शाच घेऊन पांघरून
तुझ्या कुशीत निजायचं..!
तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन
अशांत मन मोकळं करायचं..!!
स्वप्नांना माझ्या सखे तू
साकार करशील का..?
तुझ्या मनातील ' मितवा '
तू मला बनवशील का..?