तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी


तुझ्यासवे तुझ्या आठवणींची
किती करू मी मोजदाद..!
विरहात तुझ्या विझनाऱ्या
श्र्वासांची कुठे करू फिर्याद..!!
रखरखत्या उन्हात जेव्हा
तुझी आठवण दाटते..!
मला वाटते तेव्हा तुझी
सावली माझ्या सावलीस भेटते..!!
कलत्या सांजवेळी अवतरते
हुरहूरनारी ती कातरवेळ..!
हळव्या माझ्या मनात चालतो
आपल्या त्या आठवणींचा खेळ..!!
घेऊनी निजते उबदार कुशीत
दुनियेला शांत शांत ही रात..!
पण तुझ्या मधाळ आठवणी
जागवतात मला सारी रात..!!
आठवणींनी जणू ठरवलय
तुला विसरु न देणं..!
एक आठवण देऊन
माझ्याकडून आसवांच घेणं..!!