दिसतं का तुला..
दिसतं का तुला..


माझं आठवणं दिसतं..
माझं कुढणं दिसतं..
पण कधी माझा जीव काढणं..
दिसतं का तुला..
माझं चिडणं दिसतं..
माझं रागावणं दिसतं..
पण माझं आतल्या आत रडणं..
दिसतं का तुला..
माझं रुसण दिसतं..
माझं नसणं दिसतं..
पण कधी माझं असणं ..
दिसतं का तुला..
माझं हरणं दिसतं..
माझं झुकणं दिसतं..
पण तुझ्याविना कधी मरणं..
दिसतं का तुला..
माझं बोलणं दिसतं..
माझं झुरणं दिसतं..
पण कधी जिवापाड प्रेम
दिसतं का तुला..