माणसे
माणसे

1 min

371
रोज राहवे ज्यांच्यासोबत
त्यांनाही आपण कळत नाही..!
खरचं शंभर नंबरी माणूस
आयुष्यात मिळत नाही..!!
माणसे आहेत सर्वत्र
पण माणुसकी राहिली नाही..!
म्हणून आता निष्ठाही
कुणाची फळत नाही..!
बुजगवण्यासारखी माणसे बघुन
मन जिवंत राहत नाही..!
जीवाला जीव देणारी माणसे
कळूनही कळत नाही..!!
नसलेलं खोटं शोधतील
पण जिव्हाळा कोणातही नाही..!
देवा अशी निर्बुद्ध माणसे
अनुभवानेही काही शिकत नाही..!!