प्रेमगंध
प्रेमगंध

1 min

194
खूप प्रेम करतो मी
माझ्या हृदयातील राणीवर.!
कविता- चारोळ्या लिहत
असतो नेहमीच तीच्यावर..!
कधी लिहले नाही नाव
कवितेत तिचे आजवर..!
पण तिचेच नाव कोरलेय
माझ्या काळजावर..!!
भरभरून लिहतो मी माझ्या
हृदयातील प्रेम भावनांवर..!
तिच्या आठवणींचे मनोराज्य
चालते माझ्या श्र्वासांवर..!!
तिचेच नाव असते कायम
माझ्या अतृप्त ओठांवर..!
माझा वेडा श्र्वासही चालतो
फक्त तिच्यावरील प्रेमावर..!!
आगळी वेगळी प्रीत माझी
बहरलेली असेल मेल्यावर ..!.
जळून खाक होईल देह पण
प्रेमगंध दरवळेल राखेवर..!!