STORYMIRROR

VINAYAK PATIL

Romance Others

3  

VINAYAK PATIL

Romance Others

गुढ मनाचे

गुढ मनाचे

1 min
218

मन माझे गुंतले तुझ्यात 

न कळे त्यास बंध प्रेमाचे 

आज ही शोधतो तुज मनात 

न कळे मज गुढ मनाचे 


हाक दिली तुज मनाने 

गहीवरला माझा जीव 

बेचैन झालो तुझ्या प्रेमाने 

नाही तुला जीवाची कीव 


भाव मनाचे दबले मनात 

न केले मन माझे मोकळे

जीव जडला तुझ्या प्रेमात 

मज वाटे सारे जग निराळे 


अश्रुंनी उघडले दार मनाचे 

निशब्दांनी केले घातक वार 

तुझ्याविना कोण या मनाचे 

न समजून घेई हे सर्व सार 


मनाच्या कुशीत लपले शब्द 

न जानती भाव या हृदयाचे

सारे जग होई जागीच स्तब्ध 

तरीही न समजे गुढ मनाचे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance