प्रेमधागा
प्रेमधागा


तुझ्या माझ्यात कधीही
न तुटणारा ऋणानुबंध जुळला..! प्रेमभावनेपुढे हरलो अन्
तुझ्यामध्ये जीव गुंतला...।।
कळत नकळत प्रेमयोग हा
दोन मनांचा संगम घडला..!
प्रेमधागा तुझ्या हृदयातला
माझ्या श्वासात विसावला..!!
क्रित्येक ऋतू पाहिले,पण
तुझा प्रेमऋतू डोळ्यातच राहिला..!
वाहिल्या खूपदा आठवणी मात्र
चेहरा तुझा डोळ्यात तसाच राहिला..!!
म्हणतो ज्याला मी देह माझा
तो तरी कुठे माझा राहिला..!
तोही तुझ्या कल्पनांनी गंधाळला
अन् तुझ्या जाणिवांनी मोहरला..!!
बोलक्या तुझ्या डोळ्यांत सखे
आणखी किती गुंतवशील मजला..!
शब्दही झाले मुके आता
असा अबोल भावबंध जुळला..!!