STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

3  

Author Sangieta Devkar

Romance

ओढ तुझी

ओढ तुझी

1 min
83

तू आलास आणि सूखावून गेलास.

मोजकेच अश्रु तू डोळ्यातले पुसून गेलास.

तू गेलास तश्या बघ,कोरडया झाल्या विहिरी,

ओस पडल्या नदया.

माणसेच नाही,तर पशु पक्षी,

वाट पहात आहेत येण्याची तुझ्या.

आज असा तू अचानक आलास,

मरगळलेल्या मनाला हिरवागार दिलासा दिलास.

ये ना असाच अधुन मधून बघ किती ,

तहानलेला,आसुसलेला सारा गाव.

खेळू नको असा तू लपंडाव.

आता आम्ही पण केला आहे एक निर्धार.

स्वप्न पाहिले आहे ,एक शहर हिरवेगार.

तुझ्या सोबत भिजायला ही आम्हाला आवडते फार.

असा राहु नको आमच्या पासून कोसो अंतर दूर.

आस तुला भेटण्याची, अन् मनात उठते काहूर...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance