पाऊस धारा
पाऊस धारा


अंगाची झाली लाहीलाही वैशाख वणवा सर्वत्र काहीली काहीली
अशात दिलासा देणारी आली पावसाची सर प्रेमाने प्रेमाला आवरून धर
सुगंध तो मातीचा, मोहरुन टाकले क्षणात चाफ्याचा सुगंध दरवळला मनात
पावसाची ती एक सर शहारा आणणारी ठरली प्रेयसीने प्रियकराच्या कवेत जागा हेरली
आजोबांनी टाकली काठी तरातरा आजी धावत आली पाठी
नकळत आईने बाबांना मारली मिठी स्वप्नांची झाली दाटीवाटी
धरतीला आला हिरवागार बहर स्वप्न ते खुलले पहिल्या पावसाची सर
दडून बसला मातीचा सुगंध पहिल्या चहाटळ पावसाने मनाला केले बेधुंद
सावरायचं कसं बेधुंद मनाला, झाला हर्ष विसरू शकत नाही पहिल्या पावसाचा खोडकर स्पर्श