Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Romance

3  

Chandan Pawar

Romance

अधीर मन माझे...

अधीर मन माझे...

1 min
21


असतील ऋणानुबंध पूर्व जन्माचे

म्हणूनच जुळल्या रेशीमगाठी..

सखे.. नजर तुझ्या वाटेवर

अधीर मन तुझ्या भेटीसाठी..


     नजरेआड होत नाही तुझा चेहरा

    आताच तुझ्या नावाने श्वास घेतला

   तूच आस,ध्यास तूच माझं जीवन

 नित्य तुज आठवणींनी जीव व्याकुळला.


तुझ्या आठवणीत रमतांना

शब्दांचे टिपूर चांदणे होते..

तुझ्या अवखळ स्पर्शभासाचे

पुन्हा अंगभर नहाने होते..


        पाहतो सखी मी वाट तुझी

        भेटशील तू मजला याजन्मी

        तुझ्या सोबतीत मग राहणार

        कशी प्रेमाची कमी..?


तू केलेल्या प्रेमस्पर्शाने

माझ्या श्वासांचे फुलणे होईल..

अपूर्ण आहे मी तुझ्याविना

सहवासाने तुझ्या समृद्ध होईल..

         

         तुझ्यानेच सुरू होतो

         तुझ्यानेच संपतो दिवस..

         ईश्वराकडे घालतो साकडे

        तू भेटावी बोलतो नवस..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance