Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

माय

माय

1 min
12


माय पायवाट संस्कारांची

 थकलेल्या मनाची आखरी उम्मेद..!

माय परंपरांचा लळा जिव्हाळा

 माय बुरसटल्या विचारांचा छेद.. !!


 माय ऊतुंग भरारी घेणाऱ्या

 पाखरांच्या पंखातील बळ..!

 माय ढगांच्या पोटातील

 तृप्त पावसाची कळकळ..!!


माय ठेवा अनमोल मनातील

माय काळीज कोंदणं.. !

माय संसार रूपी आभाळाचं

लखलखतं टिपूर चांदणं..!!


माय मंतरलेल्या कहाणीतील

जणू फुले अंधारलेली वाट ..!

माय काटे वेचुनी पापण्यांनी,

जणू मृदू तृणांचे गालिचे दाट..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational