गोदामाय
गोदामाय
गोदामाय तूच आहे
आमुची जीवनदायिनी..!
तुझ्यामुळेच स्वप्न साकार
साऱ्या विश्वाची संजीवनी..!!
गोदामाय जगवते सर्व जीव
नाही कधी भेदाभेद उरी..!
विद्युलता निर्मितीस
हात देतसे तू सत्वरी..!!
सर्व जीवमात्रांची तृष्णा
गोदामाय तू भागवते..!
जात-धर्म, पंथ, वर्ण न
मानता निर्मळपणे वाहते..!
पवित्र आमची गोदामाय
तिच्या कृपेने हिरवं रान..!
अन्नधान्याची बरकत
बळी राजाची खरी शान..!!
गोदामाय वाही खळखळा
सुखविते दोन्ही बाजूचा किनारा..!
मानवा नको करू तिला दूषित
शुद्ध जल तिचे तुझाच सहारा..!!