कन्या...
कन्या...
1 min
3
लेक—अंधारमार्ग उजळणारी..
प्रकाशाची वाट चोखळणारी..
तिमिरावर विजय मिळविणारी
कन्या—ज्ञानाचे ज्ञानतेज..
अज्ञानाला दूर सारणारी..
जीवन समृृृध्द करणारी..
कन्या—देवासमोरची सांजवात..
भक्तीभावाने हात जुळवणारी..
शुभंकरोती ने मांगल्य भरणारी..
कन्या—दीपोत्सवाचा पताका..
सुखसमृृृध्दी वैभव संपन्नता..
मनातील अंधःकारही दूर करणारी..
कन्या—वंशाची वंशवृृृृध्दी..
सोबती बनते दिव्याची..
विश्व उजळणारी दीपज्योती..