Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

माझ्या बालचिमुकल्यांनो..

माझ्या बालचिमुकल्यांनो..

1 min
4

माझ्या बालचिमुकल्यांनो... 

तुम्ही एवढे करावे..

शाळेत दररोज येऊन

अभ्यासाचे धडे गिरवावे..

     ज्ञानाच्या अथांग सागरात

     अक्षरे-शब्द माळूनी..

     शिकुनी-सज्ञानी होऊनी

     इतरांस ज्ञान द्यावे...

     माझ्या बालचिमुकल्यांनो...

स्वार्थी आभासी दुनियेत

माणुसकीचा धडा गिरवूनी..

यशस्वी जीवनाचे सूत्र

तुम्ही येथे शिकावे...

माझ्या बालचिमुकल्यांनो...

     हृदयी-मनाच्या गाभाऱ्यात

     ममता-प्रेम बाळगूनी..

     दीन-दुबळ्या वंचितांना

     मदतीचे हात द्यावे..

     माझ्या बालचिमुकल्यांनो...

आपल्या सवंगड्यांच्या

हातात हात घालुनी..

आनंदाचे गीत तुम्ही

नित्य येथे गावे..

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics