अबाेल...
अबाेल...
बाेलत नाही ती कधीच
बाेलत नाही ताे कधीच,
फक्त डाेळे बाेलत असतात
एकमेकांच्या मनातलं जाणत असतात!!
संवाद हाेताे राेज नव्याने
विषय असताेच ताेच सदा,
कान असती भिंतीला पण
यांचा वाद गुपित सदा!!
बाेलणं जरी हाेत नसलं
तरी भावना पाेहोचत हाेत्या हृदयातल्या,
एका वेगळ्याच प्रेमाची
जाणीव हाेत हाेती मनाला!!
पाठ असते पाठीला
कुजबूज हरवली या वेळी,
शांततेचा गंध पसरला
कुतूहल वाटते अवेळी!!
<
br>
घेतील समजून एकमेकांना
हाेतील बाेलके दाेघे मग,
डाेळ्यांमधले भाव जाणता
हरवतील भाव मग!!
पण का काेण जाणे
आज त्या दाेघांचे डाेळेच भरले हाेते,
आजची भेट शेवटची
असेच जणू ते एकमेकांना सांगत हाेते!!
नक्की काय बाेलावे
दाेघानाही उमगत नव्हते,
शेवटच्या भेटीचे हे क्षण
दाोघांनाही साेडवत नव्हता!!
न बाेलता हाेतील व्यक्त
जुळतील पुन्हा मन,
दुरावलेले दाेन जीव ते
सांगतील माेठेपण!!!!!!!