STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Inspirational

विठूराया

विठूराया

1 min
0

नमो -नम तुज विठू राया 
दिन लिन सदा तुझ्या पाया 

पिवळा पितांबर खांद्यावर शेला 
कंठी तुळसी मंजुळेची माला 
कृष्ण वर्णी झळके जगी काया 
दिन लिन सदा तुझ्या पाया 

चंद्रभागा धूत असे पाय 
तुझ्या वाचून या जगी काय 
आभाळागत विठू तुझी छाया 
दिन लिन सदा तुझ्या पाया 

थोर संत करती तुझे भजन 
रंक राव करती पूजन 
आई बापाची तुझी दया 
दिन लिन सदा तुझ्या पाया 

विठू नाम सुख लोचणी 
भोवती लोटांगण शेषू रजनी 
भक्तांवर ठेव ममता माया 
दिन लिन सदा तुझ्या पाया 

शेषराव येळेकर 
दि.१५/३/२०२६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational