परीरानी
परीरानी
1 min
311
परी गं परी ,
आहेस का बरी.
येतेस का तू ,
माझ्या घरी.
पांढरे शुभ्र पंख तुझे,
ऊडत येतेस भरभर.
शोधतो आम्ही,
तूला गं घरभर.
जादूची छडी,
हातात शोभते.
कशी काय बाई,
तू जादू करते ?
पायात बूट,
तूझ्या चंदेरी.
दिसतेस मला,
तू खूपच भारी.
ईवले ईवले,
तूझे डोळे छान.
हळूच कलवतेस,
ईवलीशी मान.
हसरा चेहरा,
पाहून परीराणीचा.
आनंद वाटतो बालचमूला,
अनुभव छान खेळण्याचा.