राजे मनामनातले
राजे मनामनातले
शिवनेरी गड पावन झाला,
पाहून बाळ शिवबाला
कौतुकाने निरखत राहिला,
शिवबांच्या गोड बाळलीला
माता जिजाऊ थोर माउली,
खाणच जणू संस्काराची
दिले बाळकडू रणनीतीचे,
पेटवली मशाल स्वातंत्र्याची
जमवून मावळे सोबतीला,
शपथ रायरेश्वरी घेतली
स्वराज्याचा रचला पाया,
चिंगारी मनी अशी पेटली
तंत्र गनिमी काव्याचे,
दुश्मन कापे थरथर
सर करतच निघाले पुढे,
काबीज गड किल्ले भरभर
गरीबांचा वाली छत्रपती,
मानली परस्त्री मातेसमान
आधार ठरला शेतकऱ्यांना,
वाटती सर्वा देवासमान
राजे मनामनातले खास,
प्रेरणास्थान भावी भारताचे
घातले अंजन जनतेला,
जातपात विरहित समाजाचे
छत्रपती शिवाजी महाराज
दैवत ठरले सकलजनांचे
अंगी बाणवून शूरवीरता
करु या मनोभावे नमन तयांचे