व्यथा
व्यथा
पेटला तोच अंगार
कापली बहार
श्वास कुजबुजला
भेटला तोच अंधार
तोच दरबार
रात्रीचा सजला
बाटला तोच शृंगार
छेडूनी तार
सूरही भिजला
आटला नेत्र जलभार
दिसेना पार
काठ ही निजला
साठला मनातच वार
बंद हे दार
ठेऊनी झिजला
गोठला तोच निर्धार
पुसून आकार
वादळी विझला.
