STORYMIRROR

Manda Khandare

Tragedy

3  

Manda Khandare

Tragedy

फितूर नाती

फितूर नाती

1 min
236

रातराणीही आता

सुगंधहीन झाली।

नात्यांची किंमत

आता कवडीमोल झाली।


घरच्या आधारस्तंभाची

हाड़े ठिसुळ झाली।

पडित जमीन म्हणुनी

निलामी त्याची झाली।।


घेऊनी चिमटा पोटास

भुक त्याची शमविली।

आता भाकरीच्या कोरा पाई

त्याची नजर निष्ठुर झाली।।


माणुसकीचा पाठ त्याच्या

रक्तात गिरविला होता।

मग रक्तास रक्ताची नाती

अशी का फितूर झाली।।


पंख फुटताच पाखरे

आता परदेशी झाली।

अन् जन्मदात्यांची रवानगी 

मायदेशी वृद्धाश्रमात झाली।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy