STORYMIRROR

Vijay Bhagat

Tragedy Others

3  

Vijay Bhagat

Tragedy Others

नैसर्गिक संकट

नैसर्गिक संकट

1 min
181

भारी संकट हे आलं 

कोकणाला रडवले

काल चक्रीवादळाने

झाडं खाली लोळवले.......//1//


समुद्रही खवळला

कशा लाटा उसळल्या

येवूनिया किनाऱ्याला

धडधडा आदळल्या.......//2//


काय तुफान हे आलं

मन घाबरूनी गेलं

कसं हापूस आंब्याचं

भारी नुकसान केलं........//3//


झाडे पडली तुटून

किती छप्पर उडाले

एका चक्रीवादळाने

किती भयभीत झाले......//4//


वीज झाली ही खंडित

खांब पडलेत खाली

नैसर्गिक संकटाला

जनताही वैतागली........//5//


कोरोनाच्या संकटाने   

देश नाही सावरला           

चक्रीवादळाने पुन्हा

भारी डंखच मारला......//6//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy