मानवता हरवली तिला कुठे शोधू
मानवता हरवली तिला कुठे शोधू
मानवता हरवली
तिला कुठे कुठे शोधू,
माणुसकीचं फाटकं घोंगडं
कसं शिवू कसं बांधू
लाचारी, गरीबी, असहायता
येई नशिबी कुणाकुणाला,
परिस्थितीचा उबग येतसे
उमजेल का जनमनाला
माया, ममता, स्नेह
आटला माणुसकीचा झरा,
जो तो बनला स्वार्थी
स्वत:चं हित साधून करतो पोबारा
मानवता मनामनातील
माणुसकी ठेवूया जपून,
परिस्थितीशी दोन हात करूया
राहू मदतीला तत्पर नका पाहू लपून
