गंध
गंध
रणरणत्या उन्हानं
भेगाळली जमीन
त्यावर श्रावण सरी कधी
बरसल्याच नाहीत
त्यामुळे पावसाची नोंद घेण्याचे
कष्टही कुणाला पडले नाहीत
पण काल तिथेच
मी मातीचा गंध घेतला
होय! मातीचा गंध.....
लोक हसले माझ्या वेडेपणाला
पाऊस झाला नाही
आणि मातीचा गंध?
मीही माझ्या ओल्या पापण्या पुसल्या
आणि हसत म्हणाले.......
होय खरंच..........
पाऊस झालाच नाही
