Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

3  

राजेंद्र वैद्य कल्याणकर

Tragedy

तो अजिंक्य नोकर

तो अजिंक्य नोकर

1 min
187


तो तसा कुणीच नाही

पण समजतो स्वतःला स्वतंत्र, अजिंक्य.....१


पोटासाठी बेघर होवून आला मुंबईत

गावाकडच्या आठवणी चघळत जातोय

जीणं वीतभर खोलीत स्वतंत्रपणे...२


रोज सकाळी स्वतःला कोंबतो लोकलमध्ये

जीवावर उदार होऊन लोंबकळत दाराला

जळूसारखा प्रचंड गर्दीत आपले अस्तित्व हरवून घाम पुसत....३


कोणताही संदर्भ, ओळख दिल्याशिवाय पार्श्वभूमीवर

अमिबाच्या आकराप्रमाणे पसरलेल्या राजधानीत तो येतो

अंगात अनंत कला, पण गुळगुळीत सरकारी नोकरीत आला

पदवीचं लक्तर पांघरून नसतो आगीधगीत कोणाच्या 

आपण बरे आपले टेबल बरे ओंजळभर पाण्यात अरबी समुद्र पाहणारा...४


घेतो मागोवा, मागील भरतीतील भ्रष्टाचाराचाआपले खास मत मांडतो नेहमीच....५.           


कबुतर होऊन मनात पिंगा घालतो पगाराची वाट पहात....६


स्वातंत्र्यापार तंत्राच्या लढाईत रक्तबंबाळ

कसल्याशा ओढीने निघतो घराकडे घाईने लगबगीने

त्याचे श्रांत श्रीमंत पाऊल खोलीच्या दारात पडत

तो या विश्वाचा अनभिषिक्त सम्राट आज जाणवत त्याला.....७


पुसतो भाळावरचा घाम पुसतो

सारे महिनाभराचे दुःख, अपमान, कल्कवरचे घाव

कुरवाळत कच्च्याबच्च्यांना आपल्या स्वतःच्या जगात,

तो अजिंक्य नोकर तो अजिंक्य नोकर.....८


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy