निरोप सरत्या वर्षाला...
निरोप सरत्या वर्षाला...
निरोप सरत्या वर्षाला....
किती चांगलं अन्
किती वाईट झालं
शेवटी जे झालं ते
विधिलिखित म्हणा
किंवा मानवनिर्मित
जे घडायचं ते घडलं
कित्येकांच ओ सारं
काही उध्वस्त झालं
कित्येकजण स्वतः
उध्वस्त झाले.....
पुरे विश्वच पहा ना
कसे हादरून गेले
होत्याचे नव्हते झाले
सारे काही असूनही
कवडीमोल ठरले
परके मदतीला
धाऊनीया आले
अन आपले म्हणणारे
वेळेनुसार बदलतात
हे मात्र दाखवून गेले
सरत वर्ष शिकवून गेले
कमी खर्चात ही राहता येते
निसर्गाचे महत्व पुन्हा पटवून दिले
पक्षांचा किलबिलाट ऐकवून गेले
विनाकारण बाहेर फिरणे थांबले
आरोग्य जपण्याचे धडे मिळाले
पैश्यापेक्षा ही माणसं महत्वाची
हे वारंवार सांगून गेले
निरोप सरत्या वर्षाला
द्यावा तर लागणार
प्रत्येकाच्या आयुष्याची
संध्याकाळ ही होणार
पण आता तरी नवीन
वर्षाचे स्वागत करू
कारण जो पर्यंत जगेल
तो पर्यंत लिहेल...
