चैतन्याचा बहर
चैतन्याचा बहर
चैतन्याच्या बहराने
नभांगण हे हसले
चंद्र रश्मी सम आज
मन माझे बरसले
मनातल्या तारा छेडी
आनंदाचे भाव आज
बहरले ऋतू असे
चढे चैतन्याचा साज
उत्साहाच्या पाखरांचे
चैतन्याचे दिसे थवे
उजळल्या दिशा दाही
सप्त इंद्रधनु सवे
चैतन्याच्या बहराला
फुल सुगंधित हवे
दरवळे आसमंत
आकांक्षांचे उंच थवे
साठवूनी दवबिंदू
गवताला फुटे पान्हा
साज हिरवा धरेस
नाद बासरीचा कान्हा
रूप सगुण चैतन्य
हास्य तुषार फुलले
पुलकित रोमरोमी
गंध फूल उमलले

