STORYMIRROR

Deepali Mathane

Romance Fantasy

3  

Deepali Mathane

Romance Fantasy

लावण्यवती

लावण्यवती

1 min
395

  लावण्याचे तेज झळकले

   स्वप्न सोनेरी साकारले

   लळा लागता तुझाच सखे 

   अलगद प्रेम मनी स्विकारले

रूपगर्विता लावण्यवती तू

तुझे गीत ह्रदयी आकारले

तार छेडिता वीणेची ती

तन-मन रोम रोमी शहारले

  नजरेत ते निरागस माझे

  घायाळ प्राण सुखावले

  अलगद जपूनी सुखस्वप्न ते

  जन्मोजन्मीसाठी विसावले

साद येता तुझी मज

 गुज प्रीतीचे झंकारले

तुझ्या-माझ्या प्रेमासाठी

तू मज आहे तसे स्विकारले

   प्रेमाच्या आणाभाकांनी या

   न आता कधी दो जीव दुखावले

   अंतःकरणाच्या खोल गाभारी

   प्रेमळ जीव नेहमीसाठी सुखावले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance