शब्दांची वाट
शब्दांची वाट
शब्दांच्या वाटेवर भावनांचा प्रवास
नभीच्या चांदण्यात अपुले चांदणे खास
जपलेला अंतरिचा शेवटचा तो श्वास
शब्दांच्या वाटेतील अनेक देखणे भास
शब्दांच्या वाटेवर गंध फुलांचा सुवास
एक -एक फूलं साठवूनी होई मोठी रास
फुलं ते गुंफतांना माळ ती मोहवी मनास
शब्दगंधीत श्वास मिळे माझ्या त्या शब्दांस
शब्दांच्या वाटेवर शब्दांचाच मिळो सहवास
उजळूनी टाको मम भावनेच्या अंतरंगास
चित्र उद्याचे बोलके शब्दरंगी रंगूनी रेखाटावयास
सजवेन शब्दांची वाट माझ्यासाठी एकदम झक्कास
