STORYMIRROR

Deepali Mathane

Fantasy

3  

Deepali Mathane

Fantasy

हिरवी धरा

हिरवी धरा

1 min
325

पालवी फुटली मनास

श्रावणसरींच्या स्पर्शाने

सजली ही धरा मनोहर

हिरव्यागार बेधुंद हर्षाने

  इवले इवले तृण शहारले

  वनराई शालू निसर्गाने

   मनी श्रावण फुलला

  हिरव्या-हिरव्या रंगाने

तृप्त जाहली धरा

सुखावली कणा-कणाने

हर्षोल्हासित पशू-पक्षी

शीळ घाली वना-वनाने

  पक्षी विसावले घरट्यात

  पिले झाकली पंखाने

   स्वतः भिजूनी सरीत

   पिला भरवी दाण्याने

तन-मन चिंब चिंब

आठवणींच्या ओलाव्याने

श्रावणसरी विसावल्या

मनमयुराच्या थव्याने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy