शितल सरी
शितल सरी
पावसाच्या शितल सरी
अंगावरती बरसल्या
शोधीत आठवणींना
भावना ह्या तरसल्या
चिंब भिजले मनं
आठवणी ह्या उजळल्या
पापण्यांच्या पंखात त्या
हळूच जाऊन मिसळल्या
मोहक मृदगंधाने
चहू दिशा दरवळल्या
आसवांच्या साठवणीत
आठवणी ओघळल्या
पावसाच्या रिमझिम सरी
झऱ्यातही खळखळल्या
गोड आठवणींच्या रंगात
मी भावना उधळल्या
रिमझिमत्या सरींनी
भावना ह्या स्पर्शावल्या
चिंब भिजलेल्या मनावरती
आठवणी ह्या वर्षावल्या
पावसाच्या धुंद सरींच्या
आठवणी ह्या भावल्या
मनाच्या गाभाऱ्यात मग
एक-एक करून विसावल्या
