जरा
जरा
जाता येता कधी कधी नजरा नजर व्हायची I
नजरा नजर होता होता कधी कधी स्माईल जरा व्हायची I
स्माईल होता होता कधी कधी हाय हॅलो व्हायचे I
हाय हॅलो होता होता कधी कधी जरा बोलणे व्हायचे
बोलता बोलता कधी मन मोकळे व्हायचे I
मनमोकळे होता होता जरा कधी प्रेम जुळायचे |
प्रेम जुळता जुळता मैत्री कधी व्हायची
मैत्री जुळता जुळता
मैत्रीचे जरा नाते कधी व्हायचे |
मैत्रीचे नाते जुळता जुळता कधी सुत जरा जुळायचे I
सूत जुळता जुळता
कधी कधी संसारातून जरा कधी पळायचे|
संसारा तू न पळता पळता कधी कधी मागे वळायचे|
मागे वळता वळता समाजाला कधी कधी जरा सारे कळायचेI
समाजाला कळता कळता कधी कधी स्वतःच स्वतःचे मन दूर जरा पळायचे |
स्वतःचे मन दूर पळता पळता कधी कधी अनेकांचे जरा जीवन सरायचे I
नजरानजर होता होता कधीकधी जीवनच जरा सरायचे |

