माझी कविता
माझी कविता
माझी कविता भाव मनीचे
गुंफुनी शब्दांत मांडले
कवितेच्या वाटेवरती
भाव एक-एक सांडले
महासागर शब्दांचा ज्ञात
पण अचूक शब्द रचले
आपसूकच मग प्रत्येक
कडव्यांत भाव सजले
सुख-दुःखाचे धागे सारे
शब्दरूपात गुंफले
भावनाही मांडताना
मग मन हे वेडे जुंपले
शोधित अनुरागांचे अत्तर
सुगंधित मन जाहले
शब्दांची नाजूक वीण
विणतांना मी मलाच पाहले
अंतरंगी भाव माझे
कवितेत पहा रंगले
क्रिष्णमयी राधिकेचे
मन क्रिष्ण रंगी दंगले
